शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात 40 KW चा क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. सदरील प्रकल्प हा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) यांच्या तर्फे महाविद्यालयात प्रशासकीय इमारत व मुलींचे वसतिगृह यांच्याकरिता प्रत्येकी 20 KW ऊर्जेचा कार्यान्वित कऱण्यात आला.
महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरण ही संस्था राज्य व केंद्र सरकार यांना नैसर्गिक ऊर्जा निर्मिती करीता प्रोत्साहन देते. या करिता ती सौर, बायोमास ,जीओथर्मल ,पवन उर्जा या पासून ऊर्जा निर्मिती करण्याकरिता प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य देते.
सदरील प्रकल्पाचे काम संस्थेमध्ये, वीदयुत नूतनीकरण समन्वयक डॉ.ए.एस.माने, डॉ. आर. एम. वरखेडकर व श्री एन. डी. पडवळे यांच्या सहकार्याने पुर्ण करण्यात आले.सदर प्रकल्पाकरीता प्रा.एस.व्ही. जोशी विभागप्रमुख यंत्र तसेच संस्थेचे मा.प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले .याप्रसंगी मुलींच्या वसतिगृहाच्या कुलमंत्री डॉ. कीर्ती ठाकूर,श्रीमती ए .व्ही .कुलकर्णी उपस्थित होत्या .
सदर प्रकल्पामुळे संस्थेला येणारे वीज देयक कमी होणार असून नैसर्गिक स्रोताद्वारे विद्युत निर्मीती करण्यास चालना भेटणार आहे. भविष्यात देखील असे प्रकल्प राबविण्यात येतील असे मा.प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी सांगितले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: