शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात कॉम्बट २०१८ (COMBAT 2K18) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि.०१/०१/२०१८ रोजी कॉम्बट २०१८ (COMBAT 2K18) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रमुख अतिथी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार मा. रवींद्र सबनीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी भूषविले. या प्रसंगी बोलताना मा. रवींद्र सबनीस म्हणाले की, “ खेळामुळे आपण अहिंसक मार्गाने दुसऱ्यावर मात करू शकतो. सद्यस्थितीत आपल्याला महायुध्ये टाळावयाची असल्यास मोठ्या प्रमाणावर खेळाचे आयोजन करून विविध देशामधील शत्रुत्व अहिंसक मार्गाने नाहीसे करता येइल,यामुळेच जागतिक स्तरावर ऑंलम्पिक चे आयोजन करण्यात येते. तूम्ही यश मिळवण्यासाठी सतत कठोर मेहनत घेऊन तयार असले पाहिजे व १०० % योगदान दिले पाहिजे.”
महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत म्हणाले की, “खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त व आरोग्य मिळते.” या क्रीडा सप्ताहात सर्व प्रकारचे खेळ होणार आहेत. या कॉम्बट २०१८ (Combat 2K18) क्रीडा सप्ताहाचे नियोजन, जिमखाना प्रमुख डॉ.एन.पी.फुटाणे, श्री.एस.डी.पाटील, क्रीडा समन्वयक प्रमोद कांबळे (तृतीय वर्ष स्थापत्य) करत आहेत. सुजित कान्हेड (तृतीय वर्ष यंत्र) यांनी सुत्रासंचालन व आभार प्रदर्शन केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: