Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी व महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी करीता दि. १०/१/२०२० रोजी डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या आयोजनामागे विद्यार्थिनीमध्ये विविध डिजिटल अॅप द्वारे डिजिटल साक्षरता विषयक जागृती निर्माण करणे हे प्रमुख उदिष्ट होते . या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती अर्चना दहिवाल (डिजिटल साक्षरता तज्ञ व वरिष्ट पत्रकार पुणे ) व यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, “ मुलींनी स्वत:चे भवितव्य स्वत:च्या पायावर उभे राहून उज्ज्वल केले पाहिजे. तसेच मुलींनी कोणतीही भीती न बाळगता शौर्याने येणाऱ्या संकटाना सामोरे जाऊन मात केली पाहिजे. मुलींनी डिजिटल साक्षर झाल्यास पूर्ण घर तसेच देश वेगाने डिजिटल साक्षर व प्रगत होईल ” असे सांगितले. या प्रंसगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत म्हणाले की “विद्यार्थिनी करीता महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात . महाविद्यालयातील सर्व व्यवहार, वेतन व सर्व देयके हे डिजिटल ऑनलाइन पेमेंट द्वारे केली जातात हे महाविद्यालयाने डिजिटल साक्षरतेच्या दृष्टीने उचलेले पहिले पाऊल आहे.” कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एस.ए. सोनवणे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक, हेतू आणि उद्देश सांगितला.प्रकल्प संचालक डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी या प्रसंगी सांगितले की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई मागील तीन वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणाकरीता महाविद्यालयास आर्थिक पाठबळ देत आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी श्रीमती अर्चना दहिवाल यांनी तेजस्विनी अॅप द्वारे महिलांच्या सुरक्षितते विषयक, नमो अॅप द्वारे पंतप्रधानांशी थेट संवाद साधणे, सातबारा अॅप, डी.जी. लॉकर, भीम अॅप द्वारे ई पेमेंट , इ. विविध अॅप वरती मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले . कार्यशाळेमध्ये त्यांना उपस्थित विद्यार्थिनी चांगला प्रतिसाद दिला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी २०२० ह्या वर्षात महिलांचे डिजिटल साक्षरता द्वारे महिलांचे सक्षमीकरण यावर भर दिला आहे. सदर कार्यशाळा ही तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी,विज्ञान, कला व वाणिज्य विभागातील सर्व इच्छुक विद्यार्थिनीसाठी आयोजित करण्यात आली होती. सदरील कार्यशाळा महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या द्वारे प्रायोजित असल्यामुळे नोंदणी फी नव्हती .या कार्यशाळेत एकूण २५० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एच.एच. राक्षे (समन्वयक) यांनी केले.या कार्यक्रमाच्या संयोजन समिती मध्ये डॉ. एस.बी.खरमाळे, श्री.जी.आर.फुले, श्री.डी.जे.परेरा, श्रीमती एन.एल.पाटील सहाय्यक प्राध्यापक तसेच श्रीमती एस.डी.खडसे, श्रीमती पी.जे.मोरे, श्रीमती ए.आर.जोशी,श्रीमती के.पी.भागवत, श्रीमती पी.एस.दरांदळे, श्री.एस.एस.भोंग, श्री.ओ.ए.राऊत, श्री.आर.ए.टर्ले निदेशक, श्री.पी.ए.वाव्हळ व श्रीमती एस.एन. गुट्टे प्र.परिचर यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शन श्री एस.डी.पाटील (सह समन्वयक) यांनी केले .

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: