शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत दि.२१ व दि.२२ जानेवारी, २०२० या दोन दिवसीय कालावधीत आंबेगाव तालुक्यातील माध्यमिक शाळांकरिता विनामुल्य व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. विविध सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा या अनोख्या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
आंबेगाव तालुक्यातील जवळपास ३० माध्यमिक शाळा या शिबिरामध्ये सहभागी झाल्या. यामध्ये ३० शिक्षक व ११५ विद्यार्थी(इ. ७वी, ८वी व ९वी) असा एकूण १४५ प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. या दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात शिक्षकांसाठी ‘मनोचिकित्सा-मानसशास्त्रीय समुपदेशन, सामाजिक भान व स्वयंरोजगार, डिजिटायजेशन, औषधी वनस्पतींची ओळख व फायदे, विध्यार्थी विकासाचे मुल्यांकन’ या सत्रांचा तर विद्यार्थ्यांसाठी ‘संघर्षातून यशाकडे, विज्ञान व तंत्रज्ञान-बिनतारी संदेशवहन, खेळांचे महत्व-कबड्डी, व्यक्तिमत्व व कौशल्य विकास, शारिरीक व मानसिक आरोग्य-महत्व व संवर्धन’ या सत्रांचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभाग, प्रयोगशाळा व विविध तांत्रिक उपक्रमांची ओळख करून देण्यात आली. याशिवाय, या कार्यक्रमात सहभागी माध्यमिक शाळांनी विज्ञान प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील आपली चुणूक दाखवून दिली. या विज्ञान प्रदर्शनात सहभागी २७ प्रयोगांपैकी पारगाव येथील संगमेश्वर विद्यालयाच्या ‘रोबोटिक ब्रश’ या प्रयोगाने प्रथम तर अवसरी खुर्द येथील श्री. भैरवनाथ विद्यालयाच्या ‘शेंगा फोडण्याचे यंत्र’ या प्रयोगाने द्वितीय क्रमांक पटकाविला..
या दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात डॉ. अनुजा जाधव, प्रा. सुभाष साळुंके, श्री. धैर्यशील पाटील, श्री. मारुती तळपे, श्री. योगेश यादव, डॉ. तारक मकादिया, श्री. गोपीनाथ रावळ, डॉ. ओंकार काजळे, डॉ. सतीश केरकळ इ. वक्ते व रासेयो स्वयंसेवक यांनी विविध सत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी श्री. दत्तात्रय वारे (मुख्याध्यापक-आंतरराष्ट्रीय दर्जाची जि.प. शाळा, वाबळेवाडी), विशेष अतिथी डॉ. अनुजा जाधव, प्रा. सुभाष साळुंके व ‘अनुलोम’ या संस्थेचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी ओंकार बनबेरू व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, रासेयो सह-कार्यक्रम अधिकारी श्रीमती प्राजक्ता पिंपळकर, महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख इ. मान्यवर उपस्थित होते. माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वाच्या वि
या दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, रासेयो सह-कार्यक्रम अधिकारी श्रीमती प्राजक्ता पिंपळकर, रासेयो विध्यार्थी प्रतिनिधी योगेश शिंदे, ऐश्वर्या पवार, शुभम घोडके, कौनैन सईद, ललित चौधरी, श्रुती जाधव, अमृता माने, योगिता देशमुख, अश्विनी कुरकुटे, निखील गवांदे, ऋत्विक दुसाणे, आकाश शेटे, तेजस देशमुख, मयूर पाटील, शिवम काटे, आकाश काकडे, शिवानी गाडेकर व इतर सर्व रासेयो स्वयंसेवकांनी आयोजकाची भूमिका बजावली.
- उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करताना डॉ. अनुजा जाधव
- उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करताना प्रा. सुभाष साळुंके
- उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत
- उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करताना श्री. दत्तात्रय वारे
- डॉ. अनुजा जाधव शिक्षकांना मार्गदर्शन करताना
- डॉ. ओंकार काजळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
- डॉ. तारक मकादिया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
- डॉ. सतीश केरकळ शिक्षकांना मार्गदर्शन करताना
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात एन.एस.एस. गीतावेळी उपस्थित मान्यवर व प्रशिक्षणार्थीं
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमातील विज्ञान प्रदर्शन विजेते बक्षीस स्वीकारताना
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना सहभागी विद्यार्थिनी
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना सहभागी शिक्षक
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र स्वीकारताना
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत व उपस्थित मान्यवर
- दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत व उपस्थित मान्यवर
- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत उद्घाटन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. दत्तात्रय वारे यांचे स्वागत करताना
- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत उपस्थितांना मार्गदर्शन करताना
- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत समारोप समारंभाचे मुख्य अतिथी श्री. रामदास पालेकर, गटविस्तार अधिकारी, पंचायत समिती आंबेगाव यांचे स्वागत करताना
- रासेयो स्वयंसेवक शिक्षकांना मार्गदर्शन करताना
- श्री. गोपीनाथ रावळ शिक्षकांना मार्गदर्शन करताना
- श्री. धैर्यशील पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
- श्री. मारुती तळपे शिक्षकांना मार्गदर्शन करताना
- श्री. योगेश यादव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
- समारोप समारंभाचे मुख्य अतिथी श्री. रामदास पालेकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: