News & Events
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने मार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. ०६/०१/२०२० ते दि. १२/०१/२०२० या कालावधीत मौजे तांबडेमळा, ता. आंबेगाव जि. पुणे येथे जल्लोषात संपन्न झाले.
शिबिर कालावधीत श्रमदान सत्रामध्ये गावठाण, मंदिर, शाळा, तलावावरील बांध परिसरात स्वच्छता करण्यात आली. खेड्यांच्या प्रगतीत ‘पाणी व माती’ या दोन घटकांचे असलेले महत्व लक्षात घेऊन या विशेष शिबिरामध्ये जलप्रबोधन व जलसंधारण या कामावर मुख्यत्वे भर देण्यात आला. तांबडेमळा परिसरात उन्हाळ्यामध्ये होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन नैसर्गिक जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने जलसंधारण कामांतर्गत वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. कमी खर्चात जास्त पाणीसाठा होईल अशी जागा निश्चित करून १००० ते १५०० रिकाम्या सिमेंट पिशव्यांमध्ये दगड, माती भरून जवळपास पाच लाख लिटर पाणीसाठा होईल असा वनराई बंधारा तयार करण्यात आला.
दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये व्याख्यानमाला व सदिच्छा भेटीच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, रासेयो विभाग समन्वयक प्रा. संजय पोकळे, डॉ. शाकुराव कोरडे, प्राचार्य डॉ. सुनील पवार, रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर, श्री. इंद्रजीत केंद्रे, श्री. अर्जुन दांगट, श्री. वामन बाजारे, श्री. राजेंद्र कवळे या मान्यवरांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
सायंकाळच्या सत्रामध्ये ग्रामसर्वेक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाशी समरस होण्याकरिता शिबिरार्थी स्वयंसेवकांनी गावाची ऐतिहासिक, भौगोलिक, कौटुंबिक, शैक्षणिक, जैवविविधिय इ. माहिती जाणून घेतली.
रात्रीच्या सत्रात शाळकरी मुले, महिला, व समस्त ग्रामस्थ यांचे विविध विषयांवरील सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटायझेशन व कॅशलेस व्यवहार प्रशिक्षण, शासनाच्या विविध योजनांची माहिती, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती निर्मुलन पथनाट्य, इ. माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. याशिवाय शाळकरी मुलांकरिता विशेष लेझीम प्रशिक्षणाचे अनोखे आयोजन करण्यात आले होते. दि.११/०१/२०२० रोजी भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे मनोरंजन व प्रबोधन करण्यात आले.
शिबीर कालावधीत महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अविनाश पंत, महाविद्यालयातील विविध विभागांचे मा. विभागप्रमुख, मा. प्राध्यापक यांनी वेळोवेळी शिबिरास भेट व मार्गदर्शन याद्वारे शिबिरार्थी स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला.
शिबिराचे उद्घाटन स्वयंचल विभागप्रमुख डॉ. दिलीप पानगव्हाणे व संगणक विभागप्रमुख डॉ. शशिकांत घुंबरे यांच्या हस्ते झाले. शिबिराचा समारोप यंत्र विभागप्रमुख प्रा. श्रीधर जोशी यांच्या हस्ते झाला.
यावेळी तांबडेमळा गावचे सरपंच श्री. ज्ञानेश्वर (माऊली) भोर, उपसरपंच श्री. शिवाजी तांबडे, माजी उपसरपंच श्री. संतोष तांबडे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती धनश्री तांबडे, श्रीमती मीराताई भोर, श्रीमती छाया भोर, ग्रामसेविका आगरकर मॅडम, जि. प. शाळेतील शिक्षक श्री. पाटील सर, श्रीमती बोऱ्हाडे मॅडम, शिवशक्ती मंडळाचे साहील(पप्पू) तांबडे, युवा कार्यकर्ते व गावातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, श्रीमती प्राजक्ता पिंपळकर, निदेशक(साचेकार) श्री. शाकेर अहेमद मो. हनिफ व राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी स्वयंसेवक यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
- महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अविनाश पंत श्रमसंस्कार शिबिरा स भेट देताना
- यंत्र विभागप्रमुख श्री एस. व्ही .जोशी श्रमसंस्कार शिबिरा स भेट देताना
- रात्रीच्या सत्रात शाळकरी मुले, महिला, व समस्त ग्रामस्थ यांचे विविध विषयांवरील सांस्कृतिक कार्यक्रम
- रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, श्रीमती प्राजक्ता पिंपळकर राष्ट्रीय सेवा योजने चे सहभागी स्वयंसेवका सोबत
- वनराई बंधारा पूर्ण करण्याकरीता जे सी बी ची मदत घेण्यात आली
- वनराई बंधारा पूर्ण करण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजने चे सहभागी स्वयंसेवक काम करताना
- वनराई बंधारा पूर्ण करण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजने चे सहभागी स्वयंसेवक
- सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पथनाट्य सादर करताना
- सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी ग्रामस्थ
                                         
Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: