शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीर
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि. १२ आणि १३ जानेवारी २०१८ रोजी दोन दिवसीय विनामूल्य कौशल्य विकास शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पोपटराव महाजन (गटशिक्षणाधिकारी,पं.स.आंबेगाव),महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.यू.एस.काकडे, प्रो.एम.डी.पांचाळ इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. पोपटराव महाजन म्हणाले की “कौशल्य विकास शिबिरामुळे मुलांमधील व्यक्तीमत्व व कौशल्य विकास वाढीस मदत होईल.”
प्राचार्य डॉ ए.एस.पंत म्हणाले की “सदरील शिबिरामुळे मुलांना शालेय जीवनातच आधुनिक तंत्राची ओळख होईल ,व शिक्षकांना मुलांना वर्गात शिकवताना मदत होईल”
विविध सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांमधील कौशल्य विकासाला चालना देणे हा या शिबिराचा मुख्य हेतु होता. आंबेगाव तालुक्यातील जवळपास ५० माध्यमिक शाळा या शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ५० शिक्षक व १५० विद्यार्थ्यांचा (इ.८वी,९वी,१०वी) समावेश होता.या दोन दिवसीय शिबिरामध्ये शिक्षकांसाठी 'विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची जाणीव,डिजीटायझेशन,प्लेटलेट्स दान जनजागृती व नगदविरहीत व्यवहार' या सत्रांचा तसेच विद्यार्थ्यांसाठी 'व्यक्तिमत्व विकास,आपत्ती व्यवस्थापन,ड्रोन डीझायनिंग,खेळाचे महत्व, मार्शल आर्टस् , लर्निंग इंग्लिश, रस्ता सुरक्षा अभियान व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विश्वजित काशीद,प्रो. एस.आर.केरकळ, अक्षय काळे(रोबो-वर्ल्ड), प्रो.एम.डी.पांचाळ, राजेश टोलबोनडे (जनकल्याण रक्तपेढी),सतीश गरुड, एम.डी.मुलाणी इ. वक्त्यांचा समावेश होता. हे शिबीर यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना मधील खालील विध्यार्थ्यानी काम केले .स्वप्नील लोणकर,शुभम थावरे,श्रद्धा कुलकर्णी,कौस्तुभ संकपाळ,पूजा मरमट, महेश सोनवणे, श्रीकृष्ण तांबवे, दत्ता वरपडे,मृणालिनी पांढरे ई .
त्याचप्रमाणे समारोप समारंभासाठी स्माईल प्लस फौंडेशन चे योगेश मालखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.समारोप प्रसंगी बोलताना ते म्हणाले की "अशा प्रकारच्या शिबिराच्या आयोजनामुळे आपणास सद्य स्थितीत भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याकरीता मुले सक्षम बनतील”. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल शिंदे व वैष्णवी कापरे यांनी केले .
- कौशल्य विकास शिबीरा करता डावीकडून डॉ यु.ए स .काकडे,प्राचार्य डॉ.ए.एस .पंत
- कौशल्य विकास शिबीर - २०१८ माहितीपट
- कौशल्य विकास शिबीर - २०१७ माहितीपट
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: