शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयत पालक मेळावा संपन्न
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयत दि. १३/०१/२०१८ रोजी पालक मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने झाले .पालक मेळाव्याचे समन्वयक डॉ. एम. एस. नागमोडे यांनी आलेल्या सर्व पालकांचे स्वागत केले. तसेच त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
डॉ. ए. एस. पंत यांनी महाविद्यालयाच्या अद्यापर्यंतच्या प्रगतीचे सादरीकरण केले. यावेळी डॉ. ए. एस. पंत म्हणाले की, “या पालक मेळाव्यामुळे व पालकांच्या सहकार्याने , महाविद्यालय प्रगतीपथावर राहील, तसेच पालक हे महाविद्यालय व शिक्षक यामधील दुवा आहे”. या पालक मेळाव्यास सर्व शाखांचे एकूण ८१ पालक उपस्थित होते.यावेळी आलेल्या पालकांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
यानंतर सर्व विभाग स्वयंचल, यंत्र, अणूविद्युत, स्थापत्य, संगणक ,उपकरणीकरण यामध्ये विभागीय स्तरावर विभागप्रमुखांनी विभागाच्या सद्य स्थितीचे सादरीकरण केले व पालकांकडून असलेल्या अपेक्षा समजून घेण्यात आल्या व पालकांना विभागातील प्रयोगशाळा व असलेल्यासुविधा दाखविण्यात आल्या .यावेळी पालकांकडून पालक अभिप्राय (Parent Feedback ) घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन सुजीत कान्हेड (तृतीय वर्ष स्वयंचल) याने केले. आभार प्रदर्शन डॉ. एन . पी. फुटाणे यांनी केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: