Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थीनी कु. चारुशीला शिरीष पानवळ, तृतीय वर्ष, अणुविद्युत अभियांत्रिकी हिने दि. २५ फेब्रुवारी, २०२३ ते ३ मार्च, २०२३ या दरम्यान बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा , पटना येथे पार पडलेल्या “राष्ट्रीय एकात्मता शिबिरात” सहभाग नोंदविला.

युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दि. २५ फेब्रुवारी, २०२३ ते ३ मार्च, २०२३ या दरम्यान बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा , पटना येथे पार पडलेल्या 'राष्ट्रीय एकात्मता शिबीरा’साठी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) या महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. चारुशीला शिरीष पानवळ हीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निवड करण्यात आली होती.

या शिबिरासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विविध महाविद्यालयामधून १६ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा संघ पाठवण्यात आला होता. या शिबिरामध्ये देशभरातील एकूण ९ राज्यातील २१० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना व्यसनमुक्ती, रक्तदान, युवकांचा राजकारणातील सहभाग, G20, Y20 यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या ७ दिवसांच्या शिबिरामध्ये रोज संध्याकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना विविध राज्यांची संस्कृती समजून घेता आली, तसेच आपल्या राज्याची संस्कृती राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली. या शिबिरामध्ये दि. २८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरामध्ये कु. चारुशीला पानवळ हीने रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. तसेच शिबिराच्या शेवटच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातील युद्धकलांमधील एक असणाऱ्या दांडपट्ट्याचं देखील प्रात्यक्षिक केलं.

सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे चे संचालक डॉ. डी. कार्थीगेयन, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, विभाग समन्वयक प्रा. संजय पोकळे यांचे प्रोत्साहन लाभले.

सदर विद्यार्थीनीस हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, तसेच अणुविद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मनोज नागमोडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झाले.