शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. १६/३/२०१९ रोजी संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघटना सचिव डॉ.शाम सोनवणे व अध्यक्ष मनोज भोजने यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने झाले. माजी विद्यार्थी संघटना सचीव डॉ. श्याम सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच संघटनेमध्ये माजी विद्यार्थ्यां नी मोठ्या प्रमाणावर सदस्य होण्याचे आवाहन केले व त्या संदर्भातील नियमावलीचे मार्गदर्शन केले.
संघटनेचे अध्यक्ष मनोज भोजने यांनी ही संघटना, नोंदणी क्रमांक MAH ४४३ / १९ या क्रमांकाने नोंद झाली असून पुढील वर्षभरात माजी विद्यार्थ्यांनी संघटनेचा भाग व्हावा यांचे आवाहन केले या प्रंसगी ते म्हणाले की , “सद्यस्थितीत महाविद्यालायचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. यामुळे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयास सहकार्य राहील, त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच उद्योग व महाविद्यालयातील संवाद वाढेल ”
- उपस्थित माजी विदयार्थी
- मा.प्राचार्य डॉ ए .एस.पंत यांचे स्वागत करताना माजी विद्यार्थी
- माजी विद्यार्थी संघटना सचीव डॉ. श्याम सोनवणे कार्यक्रमाचे उद्घाटन करताना
- माजी विद्यार्थी संघटना सचीव डॉ. श्याम सोनवणे मार्गदर्शन करताना
- मेळाव्याकरीता उपस्थित माजी विद्यार्थी
- संघटना सचीव डॉ. श्याम सोनवणे यांचे स्वागत करताना विद्यार्थी
- संघटनेचे अध्यक्ष मनोज भोजने मार्गदर्शन करताना
- .सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: