Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाने तिसऱ्यांदा भिमाशंकर करंडकावर नाव कोरले

डी जी फाउंडेशन व भीमाशंकर साखर कारखाना आयोजित भीमाशंकर करंडक - युवा महोत्सव २०१८ मध्ये अवसरी (खु.) येथील शासकीय अभियांत्रिक व संशोधन महाविद्यालयाने, शिक्षक प्रतिनिधी डॉ. नितीन फुटाणे व  सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी अर्पण ठाकरे ह्यांच्या नेतृत्वा खाली भीमाशंकर करंडकाचे विजेतेपद पटकावले. महाविद्यालयाच्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.  ह्या स्पर्धेत महाविद्यालयाला वादविवाद स्पर्धेत सुजाता भानावसे व निशांत देशपांडे ह्यांच्या जोडीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तसेच वयक्तिक नृत्य स्पर्धेत स्नेहल डुबे, समूह नृत्य स्पर्धेत शिवा दुबे व ग्रुप, वक्तृत्व स्पर्धेत सुजित कान्हेड व गायन स्पर्धेत स्नेहा नगरे ह्यांना पारितोषिके मिळाली. ह्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या आयोजनात अनिकेत अडोळे, चिन्मय पटवारी, पियुष लांजेवार व इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा मोलाचा वाट होता. स्पर्धेच्या ६ व्या पर्वात शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाला करंडक मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एस पंत म्हणाले कि “महाविद्यालयाचे विद्यार्थी तांत्रिक स्पर्धे सोबतच सांस्कृतिक स्पर्धामध्ये देखील लक्षणीय यश मिळवत आहेत त्यामुळे त्यांचा सर्वागीण विकास होत आहे  ” स्पर्धेत सहभागी व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी अभिनंदन केले आहे.

  

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: