Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि. १५/२/२०२० रोजी शैक्षणीक वर्ष २०१८ -१९ च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. डॉ.एम. जे. पाबळे ( महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी) यांनी विद्यापीठ ध्वज हाती घेवून मिरवणुकीचे नेतृत्व केले .त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे अधिष्ठाता (डीन) तंत्रज्ञान विद्याशाखा, डॉ.आदित्य अभ्यंकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सरस्वती स्तवन गायनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले व विद्यापीठ गीत गायन झाले .

डॉ.एम. जे. पाबळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच महाविद्यालयातील ९७% विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यासह यश संपादित केले आहे.तसेच ज्याप्रमाणे नाणे /मडके उत्कृष्ठ असल्यास त्याचा आवाज येतो त्या प्रमाणे आपले विद्यार्थी विविधक्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावतील असे सांगितले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी महाविद्यालाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले जसे की, 40 KW चा क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, विद्यार्थ्यांनी हॅकॅथॉन, रोबोकॉन, ई -यंत्र , कब्बडी, खो-खो स्पर्धांमध्ये तसेच तांत्रिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी लाक्षणिक यश मिळविले आहे असे सांगितले. या प्रसंगी त्यांनी पद्वीग्रहन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शपथ दिली .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ ,आदित्य अभ्यंकर यांनी अनमोल मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. डॉ. आदित्य अभ्यंकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा दिवस तुमच्या आई वडिलांकरीता अभिमानाचा क्षण आहे .विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी असे सांगितले. याकरिता त्यांनी डॉ.सी.व्ही.रामन, सचिन तेंडुलकर यांची उदाहरणे दिली. पूर्वीपेक्षा आता पालकांच्या मुलांकडील अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आताच्या वैज्ञानीक जगात विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असला पाहिजे तसेच त्याच्यामध्ये संशोधक जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे, आपल्याकडे संशोधन, संस्कृती रुजवली गेली पाहिजे असे सांगितले. आपण विज्ञान लहानपणापासून शिकत आलो आहोत, परंतु फक्त पाठांतर न करता, सर्व आंधळेपणाने न स्वीकारता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. तंत्रज्ञान प्रत्येक क्षणाला बदलत आहे ,त्यामुळे कौशल्ये वाढवा ,समर्पण ठेवा व संशोधनात आंनद घ्या असा संदेश दिला. आपल्या अभ्यासक्रमामध्ये नापास होणाऱ्याला स्थान नाही. जोपर्यंत आपण चुका करणार नाही तोपर्यंत संशोधन होणार नाही. याकरिता त्यांनी स्वत:चे संशोधन परदेशात मध्ये चालू असताना, तिकडे जरी विद्यार्थ्यांची चूक झाली तरी त्यांना संशोधनाकरिता प्रोत्साहन दिले जाते याबाबत सांगितले. आपण चुकांमधून शिकले पाहिजे व त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले

आपली भारतीय संस्कृती वैज्ञानीकदृष्ट्या कशी श्रेष्ठ आहे व जगात त्याचा वापर कसा होत आहे हे त्यांनी भारतीय कॅलेडरचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. ब्रिटीश येण्याअगोदर आपली राजधानी मुंबई एवजी पुणे,कोल्हापूर,सातारा,नागपूर अशा होत्या .ब्रिटीशांनी त्यांच्या सोईनुसार मुंबई राजधानी केली परंतु सद्यस्थिती पाहता मुंबई समुद्रसपाटीपेक्षा पाच फुट खाली आहे व आपणाला तिथे पायाभूत सुविधा उभ्या करण्याकरिता खूप मोठा खर्च करावा लागत आहे.याकरिता त्यांनी बेंगलोरचे पण उदाहरण दिले. ब्रिटीशां अगोदर म्हैसूर राजधानी होती पण त्यांनी ती बंगलोर ला स्थलांतरीत केली. त्यामुळे सध्या बंगलोरला पाणीपुरवठा करण्याकरिता खूप खर्च येत आहे आपली सर्वांची जबाबदारी आहे की, या प्रश्नावर आपण संशोधक वृती ने विचार केला पाहिजे.

त्यांनी सद्यस्थितीत आय टी क्षेत्रात मोठ्या असलेल्या टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेस, गुगल, अमेझॉन यांची उदाहरणे दिली. गुगल मध्ये संशोधन करणारी मोठी टीम असल्यामुळे या कंपनीने प्रगती केली .जोपर्यंत आपण संशोधन संस्कृती शैक्षणिक क्षेत्रात आणत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही असे सांगितले .

या पदवी प्रदान समारंभाकरीता यंत्र, अणुविद्दुत, उपकरणीकरण, संगणक, स्थापत्य, स्वयंचल या शाखेचे एकूण १८५ विद्यार्थी पदवीग्रहणाकरीता उपस्थित होते. पदवीग्रहण हा त्यांचा आयुष्यातील महत्वाचा क्षण होता. यावेळी प्रत्येक शाखेच्या विभागप्रमुखांनी त्यांच्या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन केले व सन्मानिय पाहुणे डॉ.आदित्य अभ्यंकर व मा. प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व विभागांचे विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. जोशी, डॉ. डी. आर. पानगव्हाणे, डॉ. एस. यु. घुमरे, डॉ. डब्लु. एम. देऊळकर, डॉ. एम.आर. बोनगुलवार, डॉ. एम.एस. नागमोडे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती योगीता चौधरी व श्रीमती दीपा माहेश्वरी यांनी केले.

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: