Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द व भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद (डीएसटी– एनआयएमएटी प्रकल्प २०१९-२०), आय.एस.टी.ई. स्टुडंट चाप्टर आणि ईडीएसयु सेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंचल विभागात विद्यार्थ्यांकरीता उद्योजकता विकास शिबीर दि १३ ते १५ फेब्रुवारी २०२० दरम्यान संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन श्री. अभिजित डेरे (व्यवस्थापीकिय संचालक गुरुवीर सुपर इन्फ्रा राजगुरुनगर) ,श्री. अशोक शेळके (विभागीय अधिकारी एम.सी.इ.डी. पुणे) व प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी श्री. अभिजित डेरे म्हणाले की, उद्योजकता विकास करण्याकरिता आपणामध्ये सतत शिकून घेण्याची वृत्ती असली पाहिजे व कामामध्ये सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी उदयोजका कडे असावे लागणारे गुणधर्म यावर मार्गदर्शन केले.

उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.ए.एस.पंत म्हणाले की, “फक्त नोकरीकडे न वळता यशस्वी उद्योजक बनावे . विद्यार्थी उद्योजकता शिबीरामधून प्रेरणा घेऊन निश्चित उद्योजक बनतील” व श्री अशोक शेळके (विभागीय अधिकारी एमसीईडी पुणे) यांनी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण तसेच भविष्यातील उद्योजकासाठी जीवनात उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.

श्री. वैजनाथ कुलकर्णी (कुलकर्णी ऑटोमोबाईल्स पुणे ) यांनी जगाच्या, देशाच्या, समाजाच्या गरजा पाहून त्यानुसार नवीन उद्योग चालू करणे गरजेचे आहे.तसेच त्यांनी बाजार सर्वेक्षण आणि प्रतिस्पर्धी विश्लेषण यावर मार्गदर्शन केले.

श्री. हेमंत भागवत (संचालक उद्योग सारथी पुणे ) यांनी स्टार्टअप करीता कायदेशीर व नैतिक अधिकार तयार करणे, स्टार्टअप चे प्रकार, परवाना प्रणाली जी.एस.टी. याबाबत मार्गदर्शन केले. श्री. मिलिंद लोंढे (उद्योजक व संचालक सारथी उद्योग) यांनी उद्योग उभारणी करीता लागणारे भांडवल तसेच सहकार्य करणाऱ्या संस्था याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प अहवाल /बीझनेस प्लन तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

शिबिराच्या परितोषिक वितरण कार्यक्रमाकरीता श्री. सुरेश उमाप (विभागीय कार्यकारी अधिकारी, उद्योजकता विकास केंद्र महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. त्यांनी उद्योग यशस्वी करण्याकरिता समाजाशी सुसंवाद साधने, मार्केटींग करिता नवीन रणनीती तयार करणे याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी उद्योजकता शिबीरामधून प्रेरणा घेऊन यशस्वी उद्योजक बनावे हा या शिबिराच्या अयोजनामागे मुख्य मुख्य हेतू होता. एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिराअंतर्गत विद्यार्थांची औद्योगिक सहल सुयोग मिल्क अँड अॅग्रो प्रोडक्ट्स, निरगुडसर येथे आयोजित करण्यात आली होती व त्यामध्ये विद्यार्थ्यांना कृषी व औद्योगिक क्षेत्रातल्या ऑटोमेशन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराच्या आयोजनाकरीता प्रकल्प अधिकारी व संयोजक म्हणून डॉ. डी. आर. पानगव्हाणे, सहसंयोजक म्हणून डॉ. एस.ए.सोनवणे ,समन्वयक व सह समन्वयक म्हणून अनुक्रमे श्री.ए.जे.भोसले, श्री.एस.डी.पाटील तसेच शिबिराच्या आयोजनाकरिता श्री.एन.एम.काराजनगी, श्री.जी.आर.फुले, डॉ.एस.बी.खरमाळे, श्री.डी.जे.परेरा श्री.डी.एस.लेंगरे (सहाय्यक प्राध्यापक) तसेच श्री.एस.एस.भोंग, श्रीमती पी.एस.दरंदाळे, श्री.एस.के.शिवले, श्री.ओ.एस.राऊत, श्रीमती आर.के.डवणे (निदेशक) तसेच श्रीमती ए.एस.गुट्टे, श्री. प्रतिक वाव्हळ परिचर यांनी काम पाहिले.

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: