स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०१८ मध्ये शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द ला प्रथम पारेतोषिक
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथील संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०१८ या स्पर्धेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली यांनी दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट "मेस फूड वेस्टेज सेव्हर" या श्रेणीमध्ये एआयसीटीई अवॉर्ड १ व रु ५०००० चे बक्षिस मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी मेसमधील अन्नाची नासाडी कमी व्हावी या उद्देशाने प्रोजेक्ट तयार केला होता.यामध्ये सॉफ्टवेअर, वेबसाईट, अँड्रॉइड अँप्लिकेशन तसेच हार्डवेअर चा वापर करून दिलेले आव्हान यशस्वीरीत्या पार पाडले.त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी होऊन ही कामगिरी केली आहे.ही स्पर्धा देशाच्या विविध राज्यांमधील २८ नोडल सेन्टर्स वर पार पाडण्यात आली.सदरील सहभागी या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध भागांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदरील टीम ची स्पर्धा एल .एन.वेलिंगकर व्यवस्थापन वीकास आणि संशोधन संस्था मुंबई.येथे ३० व ३१ मार्च २०१८ रोजी पार पडली .
या स्पर्धेमध्ये सतत ३६ तास आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून दिलेले आव्हान पूर्ण करायचे होते.ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा नसून देशातील युवकांच्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करून देशवासीयांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठीची एक वाटचाल होती. सदर स्पर्धा आयोजीत करण्याकरता एमएचआरडी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), इंटर इंस्टिट्यूशनल इनक्लुशन इनोव्हेशन सेंटर (आय फोर सी) आणि पर्सिस्टंट सिस्टम्स यांनी सहकार्य केले .प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांचे विध्यार्त्याना मोलाचे मार्गदर्शन लाभले . महाविद्यालयातील विधार्थी देशातील विविध समस्या सोडवण्याकरता सक्षम आहेत.तसेच तसेच हॅकॅथॉन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्या तांत्रिक क्षमतांचा विकास होत आहे असे त्यांनी सांगितले
डॉ.एस.यु.घुंबरे(विभागप्रमुख संगणक अभियांत्रिकी) आणि एसपीओसी श्री डी.जे.परेरा, पी.आर.देशमुख, डॉ.के.व्ही.ठाकूर (सहायक प्राध्यापक) व युवराज शिंदे(तांत्रिक लॅब सहाय्यक) यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला यश मिळाले आहे.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची टीम कोड स्क्वाड मधील विद्यार्थी प्रवीण निकुरे (टीम लीडर), आकाश गुडधे, हर्षल इंगळे, रोशनी चिंचोळकर, विद्या सोनावणे, प्रतीक्षा वाघ व मार्गदर्शक म्हणून रवी टर्ले(तांत्रिक लॅब सहाय्यक),डॉ.भूषण बोऱ्हाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य मुलांना लाभले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: