Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.श्री एस.व्ही. जोशी दि.०४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वेच्छा सेवानिवृत्त झाले. महाविद्यालया तर्फे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

प्रा.श्री .एस.व्ही. जोशी हे शासकीय सेवेत वर्ष १९८७ मध्ये रोजी रुजू झाले होते .त्यांनी सलग ३४ वर्षाच्या कालावधीत विविध महत्वाच्या पदावर कामगिरी बजावली. ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यथे पाच वर्ष प्र.प्राचार्य म्हणून कार्यरत होते. शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात वर्ष दहा महिने प्र.प्राचार्य महत्व पूर्ण कामगिरी बजावली. अपील समिती (एसएसी) / स्थायी तक्रार समिती (एससीसी) / एआयसीटीई, नवी दिल्लीच्या सर्वोच्च समितीचे सदस्य म्हणून अनेक वेळा काम केले ,एनबीए मान्यता समितीचे सदस्य म्हणून अनेक प्रसंगी काम केले.एआयसीटीई, नवी दिल्लीच्या ७ व्या वेतन सुधारणा समितीचे सदस्य म्हणून काम केले.शासनाच्या विविध शासन निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता .

सदरील सेवा निवृती कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . महाविद्यालयातर्फे डॉ. एस. यु. घुमरे मार्फत प्रा .श्री एस.व्ही. जोशी पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले , तर डॉ डी.आर.पानगव्हाणे यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला . श्रीमती एम. बी. जाधव व श्रीमती गयाले यांनी श्रीमती अर्पणा जोशी यांचे स्वागत केले . डॉ. डी. आर. पानगव्हाणे डॉ. डब्लु. एम. देऊळकर ,डॉ .एम.आर .बोनगुलवार , डॉ. एम.एस. नागमोडे,श्री जी.आर.फुले ,डॉ एस.व्ही.करमारे, डॉ यु.एस. काकडे ,श्रीमती वाय.एन.चौधरी ,श्रीमती गयाले ,श्रीमती होनावळे,श्री शिरडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की “प्रा.एस.व्ही. जोशी यांचे काम करताना मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महविद्यालया च्या पायाभरणीपासून जडणघडनीमध्ये व प्रगती मध्ये त्यांचे योगदान खूप महत्वाचे ठरले . महविद्यालया च्या विकासाकरिता तत्परतेने निर्णय घेतले तसेच प्रत्यक विभागात सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण झाल्या ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक कौशल्यांमध्ये उच्च दर्जा प्राप्त करण्यात मदत झाली असे सांगितले.”

डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी सांगितले की ” श्रीमती अर्पणा जोशी यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने मुळे प्रा .श्री एस.व्ही. जोशी यांना विविध कठीण परीस्थित काम करता आले”..

डॉ डी.व्ही. जाधव (सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे) यांनी दूरध्वनी द्वारे प्रा .श्री एस.व्ही. जोशी यांना पुढील आयुष्या करीता शुभेच्छा दिल्या तसेच तंत्रशिक्षण विभागातील त्यांचे योगदान तंत्रशिक्षण विभाग विसरू शकणार नाही तसेच यापुढे ही त्यांचे मार्गदर्शन लाभेल असे नमूद केले. महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक तसेच साफसफाई कामगार यांच्या तर्फे प्रा.एस.व्ही. जोशी यांचा सत्कार करण्यात आला ..

प्रा.एस.व्ही. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “आरोग्याच्या कारणास्तव शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृती घ्यावी लागत आहे . जवळपास ३४ वर्ष एक शिक्षक (प्राधान्याने) व प्रशासक या नात्याने प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाड़ण्याचा प्रयत्न केला.प्रत्येकाने काम करताना बहुपर्यायी मार्गाने (आउट ऑफ बॉक्स जाऊन) संकटावर मात केली पाहिजे. ” यावेळी त्यांनी प्राचार्य तसेच त्यांचे इतर पदांवर काम करतानाचे अनुभव सांगितले ,महाविद्यालयास यापुढेही गरज भासल्यास मार्गदर्शन करेल अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली ..

तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या मार्फत प्रा.एस.व्ही. जोशी यांच्याकडून डॉ .डी. आर.पानगव्हाणे यांना प्र .प्राचार्य पदाचा कार्यभार हस्तांतर करण्यात आला आहे. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी .एम.सेवतकर यांनी केले .आभारप्रदर्शन श्री एस. एस. देशपांडे यांनी केले..


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: