अवसरी खुर्द : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) व टर्मिनल टेक्नोलॉजीज (आय) प्रा. लि. पुणे यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार दि २८ जुलै २०२१ रोजी करण्यात आला.
टर्मिनल टेक्नोलॉजीज, पुणे चे यूनिट प्रमुख श्री. प्रशांत भोसले या प्रसंगी म्हणाले की टर्मिनल टेक्नोलॉजीज ऑटोमोबाईल ,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करते . उद्योगांमधून उदयास येणाऱ्या नवीन डिझाईन ची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ,तसेच ग्राहकांच्या आव्हानात्मक गरजा टर्मिनल टेक्नोलॉजीज विकसित करत आहे. टर्मिनल टेक्नोलॉजीज पुढाकार घेत देशात नवीनतम तंत्रज्ञान आणत आहे याचा विद्यार्थांना फायदा होईल . अभियांत्रिकी महाविद्यालय आणि औद्योगिक संस्था यांच्या मध्ये अश्या प्रकारचे अधिका-अधिक करार होणे ही काळाची गरज आहे.
स्वयंचल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. आर. पानगव्हणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, ‘विद्यार्थांना अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना औद्योगिक प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे, त्या उद्येशाने सदर करार करण्यात आला आहे, सदरील करारा नुसार महविद्यालयातील विद्यार्थांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट, प्रशिक्षण, औद्योगिक भेट, औद्योगिक तज्ञांचे मार्गदर्शन ई. ची संधी मिळणार आहे, सदर बाबींमुळे विद्यार्थांचे कौशल्य विकास होण्यास विशेष मदत होईल’.
महाविद्यालचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांनी सदरील कररामुळे स्वयंचल ,अणुविद्युत ,उपकरणीकरण अभियांत्रीकी शाखेचे विद्यार्थी अधिक उद्योगाभिमुख होतील व त्यांची रोजगार क्षमता वाढेल असे म्हटले आहे .
सदर सामंजस्य करार प्रसंगी टर्मिनल टेक्नोलॉजीजचे यूनिट प्रमुख श्री. प्रशांत भोसले, मानव संसाधन व्यवस्थापक श्री. अमोल साळुंखे,प्रा. डॉ. डी. आर. पानगव्हणे, (स्वयंचल विभाग प्रमुख), श्री. एस. डी. पाटील, श्री. डी. एस. लेंगरे (सहायक प्राध्यापक )उपस्थित होते.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: