शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनाक १२/२/२०१८ ते १८/०२/२०१८ दरम्यान वडगाव (काशिमबेग) तालुका आंबेगाव येथे श्रमदान शिबिर संपन्न झाले. महावीध्यालायाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी सांगितले की, “दि. १२/०२/२०१८ रोजी सुरु झालेले श्रमदान शिबीराअंतर्गत विद्यार्थ्यांनी वडगाव (काशिमबेग) व शेजारील साकोरे गावाला जोडलेल्या बंधाऱ्यावरील १३० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. सदर पुलाला /बंधाऱ्यावरील रस्त्याला बरेच खड्डे पडले होते.शिबीर काळात ग्राम स्वच्छतेसह, कॅशलेस व्यवहार, महिला सक्षमीकरण या विषयांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिबीर कालावधीत वडगाव येथील प्राथमिक शाळेत वनअधिकारी श्री. आर. आर. मोमीन यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे गावाची माहिती विकिपिडीयावर देण्यात आली. या शिबिरात एकूण २५ स्वयंसेवकानी सहभाग नोंदवला.
सदर शिबिराला प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी स्वतः भेट देऊन , रस्त्याचे काँक्रीटीकरण कामात श्रमदान केल्यामुळे शिबिरात सहभागी मुलांचा उत्साह वाढला . राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. यु. एस. काकडे, यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिबिर आयोजनामुळे ग्रामीण भागातील समस्या आपण सोडवू शकतो.
उद्घाटन प्रसंगी, सरपंच श्रीमती खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन टेके,श्री. अमोल मानकर, श्री. संजय डोके, माजी सरपंच श्री. बाळासाहेब शिंदे, गावातील मान्यवर ग्रामस्थ, प्राचार्य डॉ. ए. एस. पंत, प्रा. एस.व्ही. जोशी ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. यु. एस. काकडे, प्रा. एम. डी. पांचाळ, प्रा. प्राजक्ता पिंपळकर, ग्रामसदस्य व राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) स्वयंसेवक उपस्थित होते. शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे .
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: