शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथिल राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककामार्फत दुर्गसंर्वधन मोहीम रविवार दि.१६/०२/२०२० रोजी राबविण्यात आली. यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पासून १० किमी. अंतरावर असलेला 'किल्ले नारायणगड' हा किल्ला निवडण्यात आला. किल्ल्यावर आवश्यक असलेली संवर्धनाची गरज व महत्व ओळखून या किल्ल्याची दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी निवड करण्यात आली. सदर किल्ला समुद्र सपाटीपासून ८७६ मी. उंचीवर असून तो गिरीदुर्ग या प्रकारात मोडला जातो.
या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी मुख्यतः स्वच्छता केली. त्यात सर्वप्रथम गडाच्या सर्वोच्च शिखरावर जावून तेथे असलेल्या हस्तामाता या देवीच्या मंदिराची स्वच्छता केली. तसेच मंदिरासमोर असलेली सुंदर अशी दीपमाळ व त्यासभोवतालचा परिसर स्वच्छ केला. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी गडावरील असलेले पाण्याचे टाके साफ केले व काही स्वयंसेवकांनी खाली उतरून जमिनीलगत असलेले नारायण टाकी देखिल साफ केले.
गडावरची स्वच्छता आटोपल्यानंतर स्वयंसेवकांनी गडाखाली येऊन गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवी मंदिर, त्यासभोवतालचा परिसर व गडाच्या पायथ्यालगतचीही स्वच्छता केली. सदर मोहीम रासेयो स्वयंसेवकांकडून दुर्ग संर्वधनाचे नियमांचे पालन करून पार पाडण्यात आली.
सदर मोहीमेचे आयोजन विदयार्थ्यी समन्वयक योगेश शिंदे, शुभम घोडके व सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, व श्रीमती प्राजक्ता पिंपळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
- गडावरील पाण्याचे टाके स्वच्छ करतांना रासेयो स्वयंसेवक
- गडावरील हस्तामाता देवी मंदिर व त्यासभोवतालचा परीसर स्वच्छ करतांना रासेयो स्वयंसेवक
- मुकाईदेवी मंदिर परिसर व गडाच्या पायथ्यालगतची स्वच्छता करतांना रासेयो स्वयंसेवक
- राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककामार्फत दुर्गसंर्वधन मोहीमेत सहभागी स्वयंसेवक
- सुयोग मिल्क अँड अॅग्रो प्रोडक्ट्स, निरगुडसर येथील यंत्र
- स्वयंसेवक सफाई करताना
- स्वयंसेवकांनी खाली उतरून जमिनीलगत असलेले नारायण टाकी साफ केली
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: