शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत अवसरी (खुर्द) येथे शनिवार, दि.१५/०२/२०२० रोजी अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार जागरूकता हे दोन उपक्रम संयुक्तरित्या यशस्वीपणे संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कामांचाच एक भाग म्हणजे हे दोन उपक्रम होत.
अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार जागरूकता हे उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली. अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळांमधील चिमुरड्यांमध्ये अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार याबाबत जागरुकता करण्यासाठी रासेयो स्वयंसेवक शनिवारी सकाळी ठीक ०८:०० वाजता या दोन शाळात दोन गटांमध्ये पोहोचले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द क्र. ०१ (मुलांची) येथे रासेयो स्वयंसेवक श्रुती जाधव आणि स्नेहल गायकवाड यांनी उपस्थित शाळकरी मुलांना पोषण आहाराबाबत मनमोकळ्या मार्गदर्शनाद्वारे संवाद साधला. तसेच रासेयो स्वयंसेवक कार्तिक घुले आणि प्रिया अन्हड यांनी उपस्थित शाळकरी मुलांना अन्न कचरा व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव तळपे व सहशिक्षिका श्रीमती धुमाळ उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द क्र. ०२ (मुलींची) येथे रासेयो स्वयंसेवक अनिरुद्ध खुडे आणि ओंकार घाडगे यांनी उपस्थित शाळकरी मुलींना चांगल्या आरोग्यासाठी पोषण आहार किती उपयुक्त आहे हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून सांगितले. तसेच रासेयो स्वयंसेवक ललित चौधरी व स्वप्नील काळे यांनी उपस्थित शाळकरी मुलींना अन्न कचरा व्यवस्थापनाचे महत्व व अन्न कचरा टाळण्याचे विविध मार्ग यांची माहिती अत्यंत रंजक पद्धतीने करवून दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अपूर्वा शेटे, सहशिक्षिका श्रीमती शैला सांडभोर, श्रीमती वैशाली जाधव आणि श्रीमती वैशाली बढे उपस्थित होत्या. दोन्ही शाळांमधील शिक्षक व विध्यार्थी रासेयोने राबविलेल्या दोन्ही उपक्रमांवर खूप खुश होते
अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या दोन्ही प्राथमिक शाळांमधील शिक्षक व विध्यार्थी यांच्याशी संवाद साधल्यानंतर रासेयो स्वयंसेवकांनी अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार जागरुकता याबाबत बनविलेली भित्तीपत्रके दोन्ही शाळा व अवसरी खुर्द गावातील ग्रामपंचायत परिसरात चिटकवली. याशिवाय तेथे उपस्थित ग्रामस्थांशी संवाददेखील साधला. उपस्थित ग्रामस्थांपैकी बरेचसे ग्रामस्थ हे वयस्क होते. या वयस्क ग्रामस्थांनी पोषण आहार हे त्यांच्या उत्तम आरोग्याचे गमक असल्याचे सांगितले. तसेच गावामध्ये विविध समारंभाच्यावेळी अन्न कचरा होतो व यापुढे आम्ही तो करणार नाही असे वचन रासेयो स्वयंसेवकांना दिले.
यानंतर रासेयो स्वयंसेवकांनी अन्न कचरा व्यवस्थापनाबाबत महाविद्यालयातील वसतिगृह खानावळी व महाविद्यालय परिसरातील खानावळी व्यवस्थापक व विध्यार्थी यांच्याशी चर्चा केली व अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याचे पटवून दिले व उर्वरित भित्तीपत्रके हि महाविद्यालयातील वसतिगृह खानावळी व महाविद्यालय परिसरातील खानावळींमध्ये चिटकवली.
अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार जागरूकता या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी रासेयो विध्यार्थी प्रतिनिधी योगेश शिंदे, शुभम घोडके, श्रुती जाधव, प्रिया अन्हड, ललित चौधरी, व सर्व रासेयो स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. रासेयो स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, व श्रीमती प्राजक्ता पिंपळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द क्र. ०१ (मुलांची) येथे रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द क्र. ०१ (मुलांची) येथे रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द क्र. ०२ (मुलींची) येथे मार्गदर्शन करताना
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द क्र. ०२ (मुलींची) येथे रासेयो स्वयंसेवकासोबत विद्यार्थांनी व शिक्षिका
- मुलीना मार्गदर्शन करताना
- विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना
- स्वयंसेवक मुलांना मार्गदर्शन करताना
- स्वयंसेवकाना प्रतिसाद देताना विद्यार्थी
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: