शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन (RESONANCE 2K18) संपन्न.
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन (RESONANCE 2K18) संपन.
अवसरी : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०१७-१८ (RESONANCE 2K18) उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांच्या हस्ते झाले.सर्व प्रकारचे सांस्कुतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.पारितोषिक वितरण कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून यु ट्यूब हास्य कलाकार करन सोनवणे हे लाभले .पारितोषिक कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ. ए.एस.पंत म्हणाले की,’’वेळ , बोललेला शब्द व संधी हि परत येत नाही तरी आपण प्रत्येक क्षेत्रात कठोर मेहनत घेतली पाहिजे.’’ याकरिता त्यांनी जागतिक धावपटू उसेन बोल्ट याचे उदाहरण दिले. महाविद्यालयात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे एकपात्री अभिनय - सुमित दांगट,एकांकिका - प्रतिक शिंदे संकेत कर्जुले, आंतरविभागीय सादरीकरण - अनुवीद्युत विभाग, उत्कृष्ठ अभिनय पुरस्कार -प्रतिक शिंदे ,कविता सादरीकरन-अश्विनी खराडे ,गायन –स्नेहा नागरे, सोलो नृत्य- स्नेहल दुबे, समुह नृत्य- मीरयाकल समुह, मिस्टर आणी मिस फिएस्टा –हरीश कारवा आणी दीप्ती पवार, जोडी स्पर्धा –प्राजक्ता चिचर,वैष्णव वीरकर ,सूत्रसंचालन –मोनिका सवासे दीपाली बागुल , वादविवाद –वैष्णवी कापरे विविध स्पर्धामध्ये यश संपादित केलेल्या विधार्थ्यांचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांनी अभिनंदन केले.
यावेळी जिमखाना प्रमुख डॉ. एन. पी. फुटाणे यांनी वर्ष २०१७-१८ मध्ये मुलांनी विविध स्पर्धांमध्ये संपादित केलेल्या यशाबद्दल माहिती सांगितली. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. यु. एस. काकडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली.
सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अर्पण ठाकरे (अंतिम वर्ष स्वयंचल) याने काम पहिले.सूत्रसंचलनाचे काम स्नेहल दुबे (अंतिम वर्ष संगणक) हिने पहिले. स्नेहसंमेलन समन्वयक म्हणून डॉ.बोनगुलवार व डॉ. देऊळकर यांनी काम पाहिले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: