'दूरदर्शन' व 'आय.आय.टी,दिल्ली' तर्फे येथे आयोजित करण्यात आलेल्या “ ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०१९ ”स्पर्धेत 'शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द' ने उत्कृष्ट प्रदर्शन करुन नेत्रदीपकयशमिळवत ऑल इंडिया रँक ४ आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच महाविद्यालयातील रोबोकॉन टीमला 'जजेस स्पेशल आवार्ड' व ट्रॉफी ने सन्मानित करण्यात आले. सदरील स्पर्धा दि .१६ जुन २०१९ रोजी 'आय. आय. टी दिल्ली' येथे भरवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये देशातील नामांकित ८६ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
महाविद्यालयातील रोबोकॉन टीम ने या स्पर्धे करिता दोन रोबोट बनवले होते, ज्या पैकी एक सेमी ऑटोमँटीक व्हिल रोबोट ज्याचे वजन २३ कि.ग्रॅम व यामध्ये न्यूम्याटिक ,लेझर आणी प्रगत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञाना चा वापर करण्यात आला होता. दुसरा ऑटोमँटीक चार पायावर चालणारा घोड्यासारखा रोबोट होता त्याचे वजन २१ कि.ग्रॅम होते . यामध्ये कॅमेरा ,विविध सेन्सर्स,थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता . सदरील दोन्ही रोबोट ला एकमेकांना माहिती देऊन विविध अडथळे पार करून शेवटी एका टेकडीवर चढून दिलेले लक्ष्य विहित वेळेत पार करावयाचे होते.सदरील दोन्ही रोबोट चे वीवीध कसोट्यांवर परीक्षण करण्यात आले. महाविद्यालयातील रोबोकॉन टीम ने 'आय. आय. टी रूङकी' आणि 'पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग' पुणे अशा नामांकित संघांना पराभूत करुन राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश मिळवले .
संघाचे नेतृत्व रोहित बंगाळ याने केले.सेमी ऑटोमँटीक व्हिल रोबोटचा ऑपरेटर सागर वाढई आणि सोबत गणेश चिंचोळकर, प्रांजल मावरे, शुभम शिंदे आणि प्रथमेश नलावडे होते. संघामध्ये विविध शाखेतील एकूण ३८ विद्यार्थी सहभागी होते. सदरील टीमने कठोर परिश्रम घेवून हे यश मिळवले. स्पर्धेच्या समारोप सोहळ्याल श्री. शशी शेखर वेम्पटी ('सी. इ. ओ. प्रसार भारती) ,श्रीमती. सुप्रिया साहू (डी. जी. दूरदर्शन) आणि श्री. बि. आर. मेहता (डीन, आय.आर. डी. दिल्ली) उपस्थित होते. प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी रोबोकॉन टीम चे अभिनंदन केले आहे .संघ समन्वयक डॉ. आर. एम. वरखेडकर व श्री. जी. एस. दातार यांचे टीम ला मोलाचे मार्गदर्शन लाभले
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: