अवसरी खुर्द: शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत ,मंगळवार दिनांक-१७-०८-२१, रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थीनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ’विद्यार्थीनी व महिलांचे आरोग्य’’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीमती जे.आर.हंगे, यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे डॉ. संजीवनी राजवाडे (विले पार्ले, मुंबई) यांचा परिचय करून दिला व व्याख्यानाचा उद्देश सांगितला. श्रीमती एच.एच. राक्षे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
तद्नंतर मार्गदर्शन करताना डॉ. संजीवनी राजवाडे यांनी सांगितले की “विद्यार्थीनीचे हिमोग्लोबिन १३ ते १६ या मध्ये असले पाहिजे, त्यासाठी त्यांनी लोहयुक्त खाद्यपदार्थ खावेत. रोज व्यायाम, योगासने केलाच पाहिजे आणि आहारात प्रोटीनचा समावेश करावा. महिलांचे विविध आजार व त्यावरील घरगुती उपाय व नवीन अद्यावत औषधोपचार याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले ” विद्यार्थीनीनी पण त्यांच्या मनातले विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. एकूण ९३ विद्यार्थीनीनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस. व्ही. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीमती वाय.एन चौधरी यांनी आभार व्यक्त केले. श्रीमती.एस.ए. ग्याले , श्रीमती एस. जे. दळवी यांनी कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: