शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे वन महोत्सव उत्साहात साजरा
.
महाराष्ट्र शासनाचा येणार्याी ३ वर्षात, एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. त्याकरिता दि. ०६/०७/२०१९ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दी. रा. पानगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. महाविद्यालय परिसर निसर्ग रम्य आहे, तसेच या वृक्ष लागवडीमुळे महाविद्यालयाचे नंदनवन होणार आहे असे प्रतिपादन मा. प्राचार्य यांनी या वेळी केले.सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी यांनी वृक्षारोपण करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर सोहळ्यामध्ये १०० कडू निंब वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील ग्रीन क्लबने केले होते. ग्रीन क्लब प्रत्येक वर्षी लावलेल्या वृक्षांची काळजी घेत आहे .कार्यक्रमाकरीता सर्व विभागप्रमुख ,अधिकारी कर्मचारी विदयार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन श्री. धी. श. लेंगरे, सहा. प्राध्यापक स्वयंचल अभियांत्रिकी, श्री. नि. दा. पडवळे, सहा. प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी आणि श्री. ए. ए. पावबाके समिती सहायक यांनी केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: