शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे दि.२१/९/२०१९ रोजी महिला सबलीकरण उद्देशाने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
यासाठी प्रमुख पाहुणे डॉ. शामा ज. कुलकर्णी (महिला समुपदेशक) नाशिक यांच्यामार्फत सर्व विद्यार्थिनींना “जीवन कौशल्य व स्त्री पुरुष समानता” यावर महिला अधिकारी कर्मचारी विद्यार्थिनीना मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की “ महिला स्वतः चे अस्तीतव उभारत नाहीत , ते उभारण्याकरीता महिलांनी उच्चशिक्षित होवून मोठ्या पदांवर पोहोचले पाहिजे,तेसेच जीवनात दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः बदल करून परीस्थिती बदलायला हवी .त्यामुळे महिला सबलीकरणाकरीता आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी” त्यांचे मार्गदर्शन मुलींसाठी मार्मिक आरसा ठरला. विद्यार्थीनीनी पण त्यांच्या मनातले विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचं निरसन केले .
सदर कार्यक्रम महाविद्यालयातील अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती द्वारे आयोजित करण्यात आलेला होता. प्रस्तुत वेळी डॉ. सुषमा कुलकर्णी (एम.डी आनंद हास्पिटल नारायणगाव) देखील उपस्थित होत्या.
कार्यक्रम श्रीमती एच.एच. राक्षे (महिला समिती अध्यक्षा) व श्रीमती के. व्ही. ठाकूर (कुलमंत्री मुलींचे वसतिगृह) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी, महिला समिती सदस्य श्रीमती वाय.एन.चौधरी व श्रीमती एन.एल पाटील महिला अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
श्रीमती एच.एच. राक्षे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी अनुजा देशपांडे व ऋतुजा चव्हाण यांनी पार पाडले.
- कार्यक्रमाकारीता उपस्थित महिला अधिकारी कर्मचारी विद्यार्थिनी
- कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. शामा ज. कुलकर्णी
- डॉ. शामा ज. कुलकर्णी (महिला समुपदेशक) नाशिक विद्यार्थिनींना “जीवन कौशल्य व स्त्री पुरुष समानता” यावर मार्गदर्शन करताना
- डॉ. शामा ज. कुलकर्णी जीवन कौशल्य व स्त्री पुरुष समानता” यावर मार्गदर्शन करताना
- डॉ. शामा ज. कुलकर्णी यांचे स्वागत करताना श्रीमती एच.एच. राक्षे.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: